उशिरा लागवड केल्याने परिणाम : कृषी खात्यातर्फे उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
उदय सावंत/ वाळपई
सत्तरी तालुक्मयातील भातशेतीला केसवर्म या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे भातशेती संकटात आली असून वाळपई विभागीय कृषी कार्यालयातर्फे भातशेती वाचविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. दरम्यान केसवर्म हा रोग पावसाचे पाणी साठल्याने होत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे उशिरा भातशेतीची लागवड झाल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे कृषी खात्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्यातरी सत्तरी तालुक्मयात मर्यादित स्वरूपात भात शेती करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी काळ्या भाताची लागवड केली आहे. तर बऱ्याच ठिकाणी कर्जत या जातीच्या भाताची लागवड केली आहे. वाळपई येथील तुकाराम हळदणकर यांनी यंदा आपल्या शेतजमिनीत काळ्या भाताची व कर्जत जातीच्या भाताची लागवड करण्यात आली होती. मात्र प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून कर्जत या भाताच्या लागवडीला केसवर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले.
पंधरा दिवसांपूर्वीच भाताची लागवड करण्यात आली होती. केसवर्म रोगामुळे भाताची पाने नष्ट होऊ लागलेली आहे. ही पाने अर्ध्यावर नष्ट होऊ लागलेली आहेत. यामुळे याचा फटका भात उत्पादनाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. केसवर्म भात रोपाची पाने नष्ट करणारा एक विशिष्ट प्रकारचा रोग आहे. भाताच्या पानावर अळ्या निर्माण होत असतात. या अळ्या भाताची पाने कुरतडून टाकतात, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे अधिकारी विश्वनाथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता केसवर्म हा रोग पावसाळ्यात होत असतो. अशी माहिती दिली. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होत असतो सदर ठिकाणी सदर किडीचा जन्म होत असतो. मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. यामुळे या किडीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात वाढ होत असते. या किडी भाताच्या पानांमध्ये लपून राहतात. दिवसा ही कीड आपले कार्य थांबवतात तर अंधार झाला की त्या भाताच्या पाने कुरतडतात. यातून भाताची पाने नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू असते. प्रादुर्भाव झालेल्या भातावर कीड नियंत्रण औषधाची फवारणी करण्यात आलेली आहे. त्याचा फायदा होत असल्याचे कृषी अधिकारी गावस यांनी सांगितले.
डिझेल-वाळू मिश्रण फवारणीचा लाभ
दुसरा एक महत्त्वाचा प्रयोग करताना. वाळू व डिझेलचे मिश्रण करून त्याची फवारणी करण्यात आली. यातून भात शेतीमध्ये साठलेल्या पाण्यावर तेल सदृश्य स्तर तयार झाली. यातून या अळ्यांना अंडी घालण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे अनेक अळ्या या पातळीखाली नियंत्रणात आल्या व यामुळे भातावरील प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आल्याचे विश्वनाथ गावस यांनी स्पष्ट केले. तसेच अन्य एक उपाय करण्यात आला. भाताच्या पातीवरून लांब दोरी धरून ती भाताच्या वरील भागांमध्ये फिरविण्यात आली. यातून ज्या ठिकाणी अळ्या लपून बसल्या होत्या त्या नष्ट झाल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात अळ्या नष्ट करण्याची प्रक्रिया अशा प्रयोगातून करण्यात आल्याचे यावेळी गावस यांनी स्पष्ट केले. भातशेतीत साठलेले पाणी कमी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यातून हा रोग मोठ्या प्रमाणात नियंत्रण आल्याचेही गावस यांनी सांगितले. दरम्यान, सत्तर तालुक्मयामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाताची लागवड करण्यात आलेली आहे. त्या भागात कृषी खात्याचे कर्मचारी भेटी देऊन शेतकऱ्यांना या संदर्भाचे प्रयोग हाती घेण्याबाबत मार्गर्शन करीत असल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली.