रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर
वृत्तसंस्था / मुंबई
शेअर बाजारातील आघाडीवरच्या 10 पैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 19 हजार 763 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आयटीसी यांनी सर्वाधिक बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ दर्शवली आहे.
मागच्या आठवड्यामध्ये 30 समभागांचा मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 561 अंकांनी वाढत बंद झाला. तर सेन्सेक्स निर्देशांकाने मागच्या आठवड्यात दुसरीकडे सर्वकालिक उच्चांकी 65,898 अंकांपर्यंत मजल मारली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 57 हजार 338 कोटी रुपयांवरुन 1 लाख 78 हजार 3,043 कोटी रुपयांवरती पोहोचले होते. आयटीसीचे बाजार भांडवल 21,291 कोटी रुपयांनी वाढीसह 5 लाख 82 हजार 602 कोटी रुपयांवर पोहचले होते. यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये देखील मागच्या आठवड्यामध्ये वाढ झालेली दिसून आली. एचडीएफसी बँकेसाठी मात्र मागचा आठवडा निराशादायी ठरला. एचडीएफसी बँकेच्या भांडवल मूल्यामध्ये घसरण झाली.