क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प येथील कॅथलीक संघटना आयोजित 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे स्वतंत्र चषक फोर ए साईड निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
सेंट झेवियर्स हायस्कूलच्या चर्च समोरील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी रेवरंड फादर, झो रॉड्रीक्स, राजन लोबो, जॉर्ज रॉड्रीक्स, मॅनो डिक्रूज आदी मान्यवर उपस्थित होते. फादर जो रॉड्रीक्स यानी चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत हुबळी, खानापूर, उचगाव, बेळगाव येथून जवळपास 32 हून अधिक संघानी भाग घेतला आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक व माजी आम. फिरोज सेठ यांच्याकडून 15 हजार रूपये रोख बक्षिस व उपविजेत्या संघाला झेविर्यर चडीचल यांच्याकडून 10 हजार रूपये व चषक देण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट खेळाडू सर्वाधिक गोल, उत्कृष्ट गोलरक्षक अशी वैयक्तीक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी गॅग्री मेंडीस, जॉन डिसोजा, डॉन्मीक डीव्रुज, जोसेफ गोन्साविल्स, साविना पाडीवाल, रिटा डिसोजा, थॉमास पिल्लोपेस, जॉन कोलगेंड आदी उपस्थित होते.