पेडणे / प्रतिनिधी
मांद्रे मतदारसंघासाठी आणि पर्यायाने किनारी भागासाठी खास स्वतंत्र पोलिस स्टेशन लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यांना धन्यवाद दिले.
पेडणे तालुक्याचे क्षेत्रफळाने मोठा असल्यामुळे पेडणे पोलीस स्थानकावरील पोलिसांवर सेवा बजावात आसताना ताण येत होता.
सुऊवातीला पेडणे पोलिस स्टेशनला वीस ग्रामपंचायती, एक नगरपालिका क्षेत्रात धावपळ करावी लागत होती. त्यानंतर, मोपा विमानतळ पोलिस स्टेशन कार्यरत झाल्यानंतर काही गावांचा त्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश झाला. उर्वरित भाग पेडणे पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे. तरीही पोलिसांना कामकाजात सुलभता यावी यासाठी मांद्रे मतदारसंघासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे, असे आमदार आरोलकर म्हणाले.
ड़ दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत ,आपली , पोलीस महानिरीक्षक ,तसेच उत्तर गोवा पोलीस अधिक्षक यांची बैठक होऊन पोलीस स्थानकाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती दिली. मांद्रे मतदारसंघात लवकरच पोलीस स्थानक होणार असून याबाबत आपण समाधानी असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यांच्याकडे आपण याबाबत मागणी केली होती ती मान्य झाल्याचे प्रियोळ मतदारसंघातील म्हार्दोळ या ठिकाणी नवीन पोलिस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांद्रेत स्वतंत्र पोलिस स्टेशन उभारले जाईल, अश घोषणा केली. त्याच अनुषंगाने आमदार जीत आरोलकर यांना विचारले असता, मांद्रे पंचायत क्षेत्रातीलच जागेत भव्य पोलिस स्टेशन उभारले जाणार आहे, असे त्यानी सांगितले.