ऑनलाईन टीम/तरुण भारत
आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील (icc t20 world cup 2022) भारताने पहिला सराव सामना जिंकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संंघ २० षटकात सर्वबाद १८० धावाच करु शकली.
दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमधील पहिला सराव सामना भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Aaustralia) यांच्यात ब्रिस्बेन येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने शेवटच्या षटकात विजय मिळवला आहे. मोहम्मद शमीने टाकलेल्या शेवटच्या शतकात चार विकेट मिळाल्या. दरम्यान, टॉस हारल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संंघ २० षटकात सर्वबाद १८० धावाच करु शकली.
दरम्यान, शेवटच्या दोन षटकात १६ धावांची ऑस्ट्रेलियाला गरज असताना हर्षल पटेलने संथ चेंडूवर फिंचचा त्रिफळा उडवला. त्याने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची तुफानी खेळी केली. यजमानांना ६ चेंडूंत ११ धावांची गरज असताना मोहम्मद शमी २०व्या षटकात पहिले षटक टाकण्यासाठी आला. विराटने सीमारेषेवर अफलातून झेल घेतला. त्यानंतर अॅश्टन अॅगर धावबाद झाला. पुढील दोन चेंडूत शमीने जॉश इंग्लिस व केन रिचर्डसन यांचा त्रिफळा ऊडवून टीम हॅटट्रिक पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी परतला. महत्त्वाच्या क्षणी विकेट्स मिळाल्याने भारताने हा सामना ६ धावांनी जिंकला.