एआयएसटीएची माहिती ः 9 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीचा समावेश
नवी दिल्ली
ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या चालू व्यापारी वर्ष 2022-23 मध्ये भारताने आतापर्यंत 5.62 लाख टन साखर निर्यात केली आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए)ने ही माहिती दिली आहे. नोव्हेंबरमध्ये, सरकारने चालू व्यापारी वर्ष 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 6 दशलक्ष टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली होती.
साखर कारखान्यांकडून 12.19 लाख टन साखर निर्यात निश्चित करण्यात आली होती, त्यापैकी चालू व्यापारी वर्षात 9 डिसेंबरपर्यंत 5.62 लाख टन साखर निर्यात झाली आहे. या कालावधीत, संयुक्त अरब अमिराती देशाला सर्वाधिक साखर निर्यात करण्यात आली आहे. त्यानंतर बांगलादेश, इंडोनेशिया, सोमालिया आणि इतरांचा क्रमांक लागतो.
सुमारे 5.22 लाख टन साखर निर्यात प्रक्रियेत आहे आणि शिपमेंटसाठी तयार आहे. भारताने व्यापारी वर्ष 2021-22 मध्ये विक्रमी 111 लाख टन साखर निर्यात केली होती.