वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
भारताच्या पुरुष स्क्वॅश संघाने सुवर्ण मिळविल्यानंतर भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोड्यांनी आपापल्या गटातील पहिल्या लढती जिंकत विजयी सुरुवात केली.
गट अ मध्ये दीपिका पल्लिकल व हरिंदर पाल सिंग संधू या जोडीने दक्षिण कोरियाच्या जाएजिन यू व व्हायेआँग युम यांच्यावर 2-0 अशी मात केली. त्यांनी ही लढत केवळ 22 मिनिटांत 11-2, 11-5 अशी संपवली. गट ड मध्ये अनाहत सिंग व अभय सिंग या दुसऱ्या भारतीय जोडीने फिलिपाईन्सच्या डेव्हिड विल्यम पेलिनो व वायव्होन अॅलीसा दलिदा यांच्यावर केवळ 15 मिनिटांत 11-7, 11-5 अशी मात केली. पुरुष एकेरीत भारताच्या महेश माणगावकरची पहिली लढत फिलिपाईन्सच्या जोनाथन रेयेसशी होईल. दीपिक पल्लिकल व हरिंदर सिंग संधू यांचा मिश्र दुहेरीचा पहिला सामना पाकच्या नूर झमान व मेहविश अली तर अनाहत सिंग व अभय सिंग यांची लढत पाकच्याच सादिया गुल व फरहान झमान यांच्याशी होणार आहे.