‘ब्लूमबर्ग’च्या नव्या सर्वेक्षणाचा अंदाज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणून चीनची ओळख आहे. मात्र भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकल्याचे ब्लूमबर्गने वर्ल्ड पॉप्युलेशन रिह्यूच्या अनुमानाचा दाखला देत म्हटले आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन रिह्यू ही जनगणनेवर लक्ष ठेवणारी स्वतंत्र संस्था आहे.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिह्यू या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार 2022 च्या अखेरपर्यंत भारताची लोकसंख्या 141 कोटीहून (141 कोटी 70 लाख) अधिक होती. ही संख्या चीनने मंगळवारी सादर केलेल्या अहवालापेक्षा 50 लाखाने अधिक आहे. चीनने स्वतःची लोकसंख्या 1.412 अब्ज असल्याचे म्हटले हेते.
भारताच्या वाढत्या लोकसंख्येतील मोठा भाग 30 वर्षांखालील लोकांचा आहे. आगामी वर्षांमध्ये जगात वेगाने वाढणाऱया प्रमुख अर्थव्यवस्थेचा भाग हे सगळे लोक होणार ओत. भारताची लोकसंख्या एप्रिल 2023 पर्यंत 143 कोटीच्या पुढे पोहोचणार आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्या वाढीचा दर अधिक आहे. 2022 मध्ये जगभरात 13 कोटी मुलांचा जन्म झाला, यातील अडीच कोटी मुले केवळ भारतात जन्माला आली आहेत. चीनमध्ये ही संख्या काही लाखांच्या घरात होती.