ऑनलाईन टीम/तरुण भारत
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. बोरिस जॉनसन हे पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले तर भारतीय वंशांचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू (Britain’s PM post) शकतात. सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत.
दरम्यान, बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू होता. अनेक नेते बोरिस यांच्यावर नाराज होते. यामुळे पक्षात बंडाचे वारे वाहत असल्याची बोरिस यांनाही कल्पना होती. मात्र अचानक अर्थमंत्री ऋषि सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी ५ जुलैला आपल्या पदाचा राजीनामा देत जॉन्सन यांना धक्का दिला. तर बोरिस जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या दोघांनी सांगितले होते. तसेच जाता जाता बोरिस त्यांच्या नेतृत्वावरच या दोघांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे बोरिस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यास भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात.
कडाऊनच्या दरम्यान आपल्या सरकारी निवासावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केलेली दारुची पार्टी त्यांना आता महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात असलेली जनतेची नाराजी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय की, असं सांगितलं जातंय की लवकरच जॉनसन (Boris Johnson) यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. दुसरीकडे, ही बातमी मात्र भारतासाठी आनंददायी ठरु शकते. कारण जर बोरिस जॉनसन हे आपल्या पदावरुन पायउतार झाले तर भारतीय वंशांचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू (Britain’s PM post) शकतात.
हे ही वाचा : ब्रिटनमध्ये राजकीय संकट; पंतप्रधान बोरिस जॉन्सन राजीनामा देण्याच्या तयारीत
सुनक पंतप्रधान होण्याची दाट शक्यता
गेल्या २४ तासात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ब्रिटनची सट्टा कंपनी ‘बेटफेयर’ने (Betfair) असा दावा केलाय की, या संकटामध्ये अडकलेल्या बोरिस जॉनसन यांना लवकरच राजीनामा द्यावा लागू शकतो. तसेच त्यांच्या जागी भारतीय वंशांचे अर्थमंत्री ऋषी सुनक त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ‘बेटफेयर’ च्या सॅम रॉसबॉटम यांनी सांगितलं की, जॉनसन यांना हटवल्यानंतर पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ऋषी सुनक यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ते ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात.
रॉसबॉटम यांनी पुढे म्हटलंय की, या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत परराष्ट्र मंत्री लिज ट्रूस, कॅबिनेट मंत्री मायकल गोव, माजी परराष्ट्र मंत्री जेरेम हंट, भारतीय वंशांच्या गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ओलीवर डॉऊडेन यांचीही नावे असण्याची शक्यता आहे.
कोण आहेत सुनक?
ऋषी सुनक यांचा जन्म हॅम्पशायरमध्ये झाला होता. ते ३९ वर्षाचे आहेत. सुनक २०१५ मध्ये रिचमंड मतदारसंघातून खासदार झाले आहेत. त्यांनी ब्रिटनच्या विंचेस्टर कॉलेजमध्ये शालेय शिक्षण घेतलं आहे. तसेच त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं आहे. ते सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. याआधी ते गृहनिर्माण मंत्री होते. कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे सुनाक हे २०२० पासून चॅन्सेलर ऑफ एक्स्चेकर असून, ते २०१९ ते २०२० या कालावधीत चीफ सेक्रेटरी टू द ट्रेझरी होते. विशेष म्हणजे कोरोना महामारीने जर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावे लागले असते तर जनतेतून ऋषी सुनाक यांनाच पसंती होती.
हे ही वाचा : गोव्यात हिंदूंच्या धर्मांतरावर बंदी-प्रमोद सावंतांची माहिती