वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील सुहल येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड कप ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत भारताने अन्य पदकांसह दोन सुवर्णपदके पटकावली. यामुळे पदकतक्त्यातील भारताचे अग्रस्थानही भक्कम झाले आहे. भारताने एकूण 5 सुवर्ण, 4 रौप्य, 2 कांस्यपदके मिळविली आहेत.
अमनप्रीत सिंगने पुरुषांच्या 25 मी. पिस्तुल व महिलांच्या 25 मी. सांघिक पिस्तुल प्रकारात सुवर्णपदके मिळविली. महिला संघात मेघना सदुला, पायल खत्री, सिमरनप्रीत कौर ब्रार यांचा समावेश आहे. अमनप्रीतने पुरुषांच्या 25 मी पिस्तुल प्रकारात 586 गुण नोंदवले तर महिला संघाने 1719 गुण घेत सुवर्ण पटकावले. कोरियाने 4 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्यपदकासह दुसरे तर अमेरिकेने 3 सुवर्ण, 3 रौप्यपदकांसह तिसरे स्थान मिळविले.