झिम्बाम्बेमध्ये दुर्घटना : एकूण 6 जण ठार
वृत्तसंस्था/ हरारे
झिम्बाम्बेच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रात एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत भारतीय अब्जाधीश आणि त्याच्या पुत्रासमवेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. उद्योजकाचे खासगी विमान तांत्रिक बिघाडामुळे एका हिऱ्याच्या खाणीनजीक कोसळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सोने, कोळसा, निकोल अन् तांब्याच्या खाणींची मालकी असणारी कंपनी रिओझिमचे मालक हरपाल रंधावा आणि इतर चार जण या दुर्घटनेत मारले गेले आहेत. हे विमान मशावाच्या जवामाहांडे क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हे विमान रियोझिम कंपनीच्या मालकीचे होते आणि ते सेसना 206 प्रकारचे होते. हरारे येथून मुरोवा हिऱ्याच्या खाणीच्या दिशेने प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली आहे.