वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या यू-17 पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक बिबियानो फर्नांडेस यांनी एएफसी यू-17 आशियाई चषक स्पर्धेसाठी 23 सदस्यीय संघाची घोषणा केली.
थायलंडमध्ये ही स्पर्धा होणार असून भारताचा यू-17 संघ सध्या स्पेन व जर्मनीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. गेल्या दीड महिन्यापासून या संघाचे तेथे ट्रेनिंग सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत तयारीचा भाग म्हणून तेथील युवा संघ अॅटलेटिका डी माद्रिद, सीडी लीगेन्स, रियल माद्रिद सीएफ, गेटाफे सीएफ, व्हीएफबी स्टुटगार्ट अशा अनेक संघांविरुद्ध सामने खेळले आहेत. त्यांनी पाच विजय, चार पराभव व एक ड्रॉ अशी कामगिरी नोंदवली आहे. 1 जून रोजी हा संघ थायलंडला प्रयाण करणार असून तेथे या संघाचे सामने व्हिएतनाम (17 जून), उझ्बेकिस्तान (20 जून), जपान (23 जून) यांच्याविरुद्ध पथुम थानी व बँकॉक येथे होणार आहेत.
भारताचा यू-17 संघ : गोलक्षरक-साहिल, जुल्फिकार गाझी, प्रणव सुंदररमण. बचावफळी-रिकी मीतेई हाओबम, सुरजकुमार सिंग एन्गांगबम, मुकुल पन्वर, मालेमगाम्बा सिंग थॉकचोम, परमवीर, धनजीत. मध्यफळी-व्ही. गायटे, डॅनी मीतेई लैशराम, गुरनाज सिंग ग्रेवाल, कोरू सिंग थिंगुजाम, लालपेखलुआ, रोहन सिंग, ओमांग दोडम, फैजान वाहीद, आकाश तिर्की, प्रचित विश्वास, नायक गावकर. आघाडी फळी-टी. गांगटे, शाश्वत पन्वर, गोगोचा चुंगखाम, लेमेट तांगवाह. प्रशिक्षक-बिबियानो फर्नांडेस.