भारतीय किसान युनियनचे (BKU) नेते राकेश टिकैत यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला आठवड्याचा कालावधी दिला आहे. कुस्तीपटूंवरिल आंदोलन संबंधित प्रश्नावर पुढील पावले उचलण्याबाबत विचार करण्यासाठी सरकारला इशारा दिला आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथे “खाप महापंचायत”च्या बैठकीनंतर शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी ही घोषणा केली.
“हरियाणाचा मोठा संदेश केंद्र सरकारला कुरुक्षेत्रातील खाप पंचायतच्या माध्यमातून गेला पाहीजे. केद्र सरकारला ब्रिजभूषण सिंग यावर 7-10 दिवसात कारवाई करा” असे आवाहन केले. खाप पंचायतीच्या या आव्हानामुळे ब्रिजभुषण सिंग यांनी ५ जूनची अयोध्येतील ‘महा रॅली’ रद्द केली आहे
पुढे बोलताना ते म्हणाले, “सरकारने कुस्तीपटूंच्या तक्रारींचे निराकरण केले पाहिजे आणि ब्रिजभूषण शरण सिंग यांना अटक केली पाहीजे अशी आमची मागणी आहे. नाहीतर आम्ही 9 जून रोजी जंतरमंतर, दिल्ली येथे पैलवानांसह जाऊन देशभरात पंचायत घेऊ.” असे सांगून 9 जूनला जंतरमंतरवर बसू न दिल्यास तीव्र आंदोलन उभा केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.