सेन्सेक्स निर्देशांक 294 अंकांनी घसरला : ग्रेसिम सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
चार दिवसांच्या तेजीला शेअरबाजारात गुरुवारीअखेर विराम मिळाला आहे. जागतिक मिश्र कल व रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाचा परिणाम शेअरबाजारावर दिसून आला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 294 अंकांच्या (0.47 टक्के) घसरणीसह 62,848 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 91 अंकांच्या (0.49 टक्के) घसरणीसह 18,634 अंकांवर बंद झाला होता. स्मॉल कॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्याने घसरणीत राहिला होता. शेवटच्या तासाभराच्या कालावधीत शेअरबाजार घसरुन 63 हजारच्या पातळीखाली स्थिरावला. अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाचे नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आले. गुंतवणुकदारांनी या निर्णयानंतर सावधगिरी बाळगल्याचे दिसून आले. निफ्टी निर्देशांकात माध्यम आणि रिअल्टी निर्देशांक 2 टक्के तर आयटी, फार्मा आणि हेल्थकेअर निर्देशांक जवळपास 1 टक्का इतके घसरणीत राहिले होते. ग्रेसिम इंडस्ट्रिज व कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग सर्वाधिक 3 टक्के इतके घसरणीत होते. सनफार्मा, टाटा कन्झुमर्स प्रोडक्टस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग 2 टक्के घसरणीत होते. अपोलो हॉस्पिटल, महिंद्रा आणि महिंद्रा आणि भारत पेट्रोलियम यांचे समभागदेखील नुकसानीत राहिले होते. दुसरीकडे एनटीपीसी आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांचे समभाग 3 टक्के आणि ओएनजीसीचे समभाग 2 टक्के तेजीसह बंद झाले. पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन टुब्रो, बजाज ऑटो आणि सिप्ला यांचे समभागदेखील तेजीसमवेत बंद झाले. शेअर बाजारात 202 समभागांना अप्पर सर्किट लागले होते. ऊर्जा निर्देशांक 2 टक्के इतका वाढीसह बंद झाला. जागतिक बाजाराचा विचार करता अमेरिकेतील बाजारात मिश्र कल दिसून आला. असाच काहीसा कल युरोपियन बाजरातदेखील गुरुवारी पहायला मिळाला. अमेरिकेतील बाजारात डोव्ह जोन्स निर्देशांक तेजीत होता. आशियाई बाजारात निकी, कोस्पी निर्देशांक घसरणीत तर शांघाई कंपोझिट आणि हँगसेंग निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एनटीपीसी 182
- जेएसडब्ल्यू स्टील 748
- ओएनजीसी 156
- लार्सन टुब्रो 2340
- पॉवरग्रिड कॉर्प 241
- सिप्ला 965
- बजाज ऑटो 4800
- हिरोमोटो कॉर्प 2964
- एचडीएफसी 2653
- एचडीएफसी बँक 1608
- रिलायन्स 2499
समभाग घसरलेल्या कंपन्या
- ग्रेसिम 1711
- कोटक महिंद्रा 1886
- सनफार्मा 987
- टेक महिंद्रा 1071
- अपोलो हॉस्पिटल 4926
- बीपीसीएल 361
- आयशर मोटर्स 3657
- महिंद्रा आणि महिंद्रा 1381
- अॅक्सिस बँक 962
- टाटा मोटर्स 559
- एचयूएल 2679
- डिव्हिज लॅब्स 3499
- टीसीएस 3236
- कोल इंडिया 228
- हिंडाल्को 418
- टायटन 2877
- बजाज फायनान्स 7010
- अदानी पोर्ट्स 736
- भारती एअरटेल 836
- नेस्ले 22148
- बजाज फिनसर्व्ह 1467
- विप्रो 399
- अल्ट्राटेक सिमेंट 8100
- इंडसइंड बँक 1303
- यूपीएल 690
- एसबीआय लाईफ इन्शु. 1238
- डॉ. रे•ाrज लॅब्स 4649
- मारुती सुझुकी 9658
- इन्फोसिस 1282
- एशियन पेंट्स 3212