सेन्सेक्स 79 अंकांनी वधारला: धातू निर्देशांक घसरणीत
वृत्तसंस्था /मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. दिवसअखेरमात्र सेन्सेक्स, निफ्टी अल्पशा तेजीसोबत बंद झाले. धातु निर्देशांक घसरणीत होता तर आयटी निर्देशांकाने बाजाराला सहारा दिल्याचे दिसून आले. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 79 अंकांनी तेजी राखत 65,401 अंकांवर तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 6 अंकांच्या वाढीसह 19434 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीत एलटीआय माइंडट्री आणि डिव्हीस लॅब्ज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर अदानी एंटरप्रायझेस व जेएसडब्ल्यु स्टील मात्र मोठ्या नुकसानीत पाहायला मिळाले. बीएसईवर सोमवारी सेन्सेक्समध्ये पाहता रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग सर्वाधिक 1.73 टक्के इतके वधारलेले होते. सोबत इन्फोसिस, एचयुएल, आयसीआयसीआय बँक, लार्सन टुब्रो, एशियन पेंटस्, नेस्ले, अॅक्सिस बँक, विप्रो व कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले होते.
दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टीलच्या समभागाची चमक कमी झालेली दिसली. समभाग 2.47 टक्के घसरला होता. यासोबत एसबीआय, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, एचसीएल टेक, टायटन आणि सन फार्मा यांचे समभागही घसरणीसह बंद झाले. विविध निर्देशांकावर नजर फिरवल्यास आयटी आणि एफएमसीजी क्षेत्राचे निर्देशांक तेजीसह बंद झाले होते. धातू निर्देशांक 2 टक्के इतका घसरणीत होता. ऊर्जा, रियल इस्टेट व सार्वजनिक बँकांचा निर्देशांक 0.5 टक्के इतके घसरणीत होते. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येक 0.5 टक्के घसरण दिसून आली. अमेरिकेतील डॉलरच्या तुलनेत रुपया घसरणीसह 82.95 वर बंद झाला. याआधीच्या सत्रात रुपया 82.85 वर बंद झाला होता. मंगळवार 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअरबाजार बंद राहणार आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एलटीआय माईंड ट्री 5193
- इन्फोसिस 1393
- डीव्हीजलॅब्ज 3730
- एचयुएल 2533
- रिलायन्स 2577
- लार्सन टुर्ब्रो 2659
- आयसीआयसीआय बँक 959
- एशियन पेंटस् 3202
- विप्रो 415
- ओएनजीसी 178
- हिरोमोटोकॉर्प 3010
- बजाज ऑटो 4616
- अॅक्सिस बँक 939
- नेस्ले 21899
- सनफार्मा 1134
- कोटक महिंद्रा 1794
- आयटीसी 449
- पॉवरग्रिडकॉर्प 244
- महिंद्रा आणि महिंद्रा 1546
- टीसीएस 3439
- डॉ. रे•ाrज लॅब्ज 5823
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अदानी एंटरप्रायझेस 2456
- जेएसडब्ल्यू स्टील 799
- हिंडाल्को 450
- एसबीआय 560
- टाटा स्टील 118
- अपोलो हॉस्पिटल 4820
- अदानी पोर्टस् 787
- युपीएल 590
- आयशर मोटर्स 3338
- बजाज फिनसर्व्ह 1482
- सिप्ला 1235
- एसबीआय लाईफ 1297
- अल्ट्राटेक सिमेंट 8054
- ग्रेसिम 1811
- टाटा मोटर्स 607
- बजाज फायनान्स 7018
- इंडसइंड बँक 1388
- एचडीएफसी बँक 1610
- कोल इंडिया 233
- भारती एअरटेल 867
- मारुती सुझुकी 9321