सेन्सेक्स अल्पशा तेजीसह बंद : बजाज फायनान्स नफ्यात
मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार काहीसा स्थिर पातळीवर बंद झाला होता. बजाज फायनान्सचा समभाग 4 टक्के वाढला होता तर बर्जर पेंटस् मात्र 8 टक्के नुकसानीसह बंद झाला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 14 अंकांच्या तेजीसमवेत म्हणजे 0.02 टक्के वाढीसह 66023 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 19674 अंकांवर स्थिरस्थितीत बंद झाला होता. निफ्टीत बजाज फायनान्सचा समभाग सर्वाधिक नफ्यात होता. टाटा कंझ्युमर प्रोडक्टस् आणि अपोलो हॉस्पिटल यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे हिंडाल्को इंडस्ट्रिज, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, हिरो मोटो कॉर्प आणि इन्फोसिस यांचे समभाग मात्र सर्वाधिक घसरणीत राहिले होते.
क्षेत्रांच्या निर्देशांकावर नजर टाकल्यास रियल इस्टेट निर्देशांक 1.5 टक्के वाढत बंद झाला. बँक निर्देशांकही 0.3 टक्के इतका तेजीसह बंद झाला असून आयटी निर्देशांक 0.7 टक्के व कॅपिटल गुड्स निर्देशांक 0.3 टक्के घसरणीसह बंद झाला होता. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.40 टक्के तेजीत होता तर स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर पातळीवर बंद झाला.
हे समभाग तेजीत..
बीएसई सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्ससोबत बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंटस् यांचे समभाग प्रत्येकी 1 टक्के वाढीसह बंद झाले. अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया आणि टायटन यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
हे समभाग घसरणीत..
इन्फोसिस यांचे समभाग मात्र मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. यासोबत महिंद्रा आणि महिंद्रा तसेच विप्रो यांचे समभागदेखील प्रत्येकी 1 टक्के इतके नुकसानीसह बंद झाले. टीसीएस, सनफार्मा, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रिज, लार्सन टुब्रो, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसीचे समभाग घसरणीसह बंद झाले होते.