वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात होणाऱ्या 16 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने रविवारी 23 सदस्यांच्या भारतीय फुटबॉल संघाची घोषणा केली आहे. सदर स्पर्धा 1 ते 10 सप्टेंबर दरम्यान भूतानमध्ये खेळवली जाणार आहे.
भारताच्या 16 वर्षाखालील वयोगटाच्या फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इश्फाक अहमद यांनी या आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. रोहित, ए. सुरजसिंग, आरुश हरी या गोलरक्षकांचा संघात समावेश करण्यात आला. या आगामी स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने संभाव्य 50 फुटबॉलपटूंची निवड करून त्यांच्यासाठी श्रीनगरमध्ये जुलैपासून सराव शिबिर घेण्यात आले होते. सदर शिबिर संपल्यानंतरच भारतीय संघ निवडण्यात आला.
भारतीय फुटबॉल संघ : गोलरक्षक : रोहित, ए. सुरजसिंग, आरुष हरी, बचावफळी : एन. अभिजित, मोहमद कैफ, वाय. चिंगकेम, यु. थोगंबा, व्ही. हेंगशिंग, सी. रेनीनसिंग, करीश सोरम, मध्यफळी : न्युटन सिंग, क. योहेंबा मेटाई, झे. लेविस, बॉबी सिंग, अब्दुल सलाह, एन. मेटी, विशाल यादव, एम. मेलंगींग, मोहमद अब्रास, आघाडीफळी : एन. रिशीसिंग, ए. सॅमसन, एल. भरत आणि के. एअरबोरलेंग.