वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काठमांडू येथे 21 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताचा 23 जणांचा युवा फुटबॉल संघ जाहीर करण्यात आला. या संघाला एस. पांडा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभत आहे.
या स्पर्धेपूर्वी भारतीय युवा फुटबॉल संघाला सराव शिबिर आयोजित केले असून शुक्रवारी हा संघ सोदी अरेबियाला रवाना झाला आहे. 19 सप्टेंबरला भारतीय युवा फुटबॉल संघ नेपाळमध्ये दाखल होईल. या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश असून भूतान आणि बांगलादेश यांचा सहभाग आहे. अ गटात यजमान नेपाळ, मालदीव आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. सदर स्पर्धा सिंगल राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार असून त्यानंतर दोन्ही गटातील पहिले दोन आघाडीचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 30 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाइल. गेल्या वर्षी 20 वर्षाखालील वयोगटाची सॅफ फुटबॉल स्पर्धा भारतात भरवली गेली होती आणि यजमान भारताने बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.
भारतीय फुटबॉल संघ : लायानेल रिमेई, डी. ठक्कर, मनज्योतसिंग परमार, थॉमस चेरियन, जहांगीर अहमद शेगु, विजय मरांडी, सिबा प्रसाद, बी. मनबीर, सुरजकुमार सिंग, रिकी मेताई, एम. किपगेन, एस. इशान, अर्जुन सिंग ओनाम, यश चिक्रो, येसुदेसन, राजा हरिजन, टी. टाँगसिन, जी. गोयारी, साहिल खुर्शीद, लिंकी सी., केल्विन सिंग तेओराम, नाओबा मेताई आणि एस. दिनेश सिंग.