वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघामध्ये दुखापतग्रस्त प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप शर्माचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला असल्याची माहिती या संघाच्या फ्रांचाईजीने दिली. त्याचप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने बेअरस्टोच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मॅथ्यू शॉर्ट बरोबर नवा करार केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मॅथ्यू शॉर्टचे आयपीएल स्पर्धेत पर्दापण होत आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेत सलामीचा फलंदाज शॉर्टने स्पर्धाविराचा बहुमान मिळविला होता. त्याने या स्पर्धेत फलंदाजीत 458 धावा तसेच गोलंदाजीत 11 गडी बाद केले होते. पंजाब संघाने शॉर्टला 20 लाख रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले आहे.