आवश्यक ठिकाणी खबरदारी घेण्याची सूचना : पावसाळय़ात चोवीस तास लक्ष ठेवण्याचे आदेश : डिचोलीत आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली तालुक्मयातील विविध खाण कंपन्यांच्या खनिज खंदकांची जिल्हाधिकारी मामू हगे यांनी इतर अधिकाऱयांसह पाहणी केली. पावसाळय़ात या खंदकांमुळे गावांना तसेच मानवी जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याची सूचना संबंधित खात्यांच्या अधिकाऱयांना दिली. तसेच खाण कंपन्यांनीही या आपत्कालीन समयी सरकारला मदत करताना पूर्ण सहकार्य करावे, अशी सूचना देण्यात आली.
जिल्हाधिकारी मामू हागे यांनी अधिकारी वर्गाकडून माहिती घेत प्रत्यक्ष पाहणीतून अनेक निरीक्षणे करून सुरक्षा उपायाबाबत अधिकारी वर्गाला सूचना व आदेश दिले आहेत. काही ठिकाणी पंप आहेत ते तसेच ठेवून कंपनीने त्यासाठी सुरक्षा उपाय योजनेबाबत सहकार्य करावे, असा आदेश दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेला आहे. त्यानुसार आज पाहणीवेळी विविध कंपनी अधिकारी हजर होते व त्यांनी ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिलेली आहे.
डिचोली तालुक्मयातील विविध खनिज खंदक पावसाळय़ात धोकादायक ठरण्याची भीती असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. वरि÷ पातळीवर बैठका घेऊन खाण कंपनी तसेच प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने सुरक्षा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यालाच अनुसरून व परिस्थितीची गंभीर दखल घेऊन काल शुक्रवार दि. 20 मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी मामू हागे, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर, जलसंपदा खात्याचे सहायक अभियंता नरेश पोकळे, सिद्धार्थ शिरोडकर, विवेक परब, खाण खात्याचे सुधीर मांदेकर, सार्वजवनिक बांधकाम खात्याचे महादेव नाईक, विविध खाण कंपनीचे अधिकारी यांनी संयुक्तपणे कुडणे, साखळी, शिरगाव, लामगाव, पैरा, डिचोली, मुळगाव, गावठण या भागातील खदकांची पाहणी केली.
जिल्हाधिकारी मामू हागे यांनी यावेळी उपस्थित विविध खात्यातील अधिकाऱयांना आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वच खंदकात पंपिंग सुविधा उपलब्ध करणे, ज्या ठिकाणी मातीचा भराव खचण्याची भीती आहे धोका आहे त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाय करणे, पावसाळय़ात नियमित लक्ष ठेवणे, याबाबत मामलेदार उपजिल्हाधिकारी आदींना सूचना केल्या आहेत.
…………………..
आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज
डिचोलीत आपत्कालीन नियंत्रण कक्ष सजग करण्यात आलेला असून मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर तसेच विविध खात्यातील अधिकारी वर्ग, तालुक्मयातील सर्व तलाठी तसेच पंचायत पातळीवरही पावसाच्या दिवसांत सुरक्षितता व इतर बाबतीत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आजच्या पाहणीनंतर काही ठिकाणी पंपिंग स्टेशन सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी जलसंसाधन खात्याला सूचना देण्यात आली आहे. तसेच सेसा वेदांत कंपनीला खंदकात असलेले पंप काढू नयेत तर चालू करून घ्यावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आजच्या पाहणीच्या सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर तातडीने सुरक्षा उपायांबाबत काम सुरू होणार आहे.
डिचोली तालुक्मयातील विविध खनिज खदकांची पाहणी आम्ही केली व एकूणच परिस्थितीचा आढावाही घेतला. ज्या ज्या ठिकाणी काळजी व उपाययोजनांची गरज आहेत. त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाय करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, असे डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी सांगितले.