जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलिसांविरोधात तक्रार
बेळगाव : अथणी तालुक्यातील मदभावी गावामध्ये गाडीव•र कुटुंबीयांशी संबंधित असणाऱ्या जमिनीचा वाद न्यायालयात असतानाही पोलिसांकडून सदर जमिनीवर गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे गावातील वातावरण बिघडले असून याची पाहणी करून न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राष्ट्रीय समिती पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मदभावी येथील रुक्मिणी गुऊनाथ गाडीव•र यांच्या भावकीतील जमिनीचा वाद न्यालयात आहे. या प्रकरणी न्यायालयात वाद सुरू असून आपल्या बाजूने डिक्री झाली आहे. असे असताना पोलीस अधिकारी शिवकुमार मुकरी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या विरोधी असणाऱ्या पक्षकाराला सदर जमिनीमध्ये गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास परवानगी दिली आहे. पोलिसांकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी भेट देऊन आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केआरएस पक्षाकडून रुक्मिणी गाडीव•र यांनी केली आहे. मागणीचे निवेदन शिरस्तेदार एस. एम. परगी यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.