वाचा असा आहे स्पर्धेचा निकाल
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले कॅम्प येथील उपरकर शूटिंग अकॅडमी येथे बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित मुंबई विद्यापीठ (कोकण झोन ४) च्या नेमबाजी स्पर्धेत मुलांच्या गटातून डी. बी. जे. कॉलेज चिपळूण (रत्नागिरी) चा सुरज कमलेश साळवी तर एस. के. पाटील कॉलेज मालवण (सिंधदुर्ग) ची हर्षदा दिपक नाईक हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले.
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित मुंबई विद्यापीठ (कोकण झोन ४) च्या नेमबाजी स्पर्धा वेंगुर्ले कॅम्प येथील उपरकर शूटिंग अकॅडमी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गं च्या कॉलेजमधील मुलगे व मुली नेमबाज खेळाडूनी सहभाग घेतला. या स्पर्धेप्रसंगी उपस्थित मान्यवरांत बँ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, अँड. विक्रम भांगले, उपकर शूटिंग अँकॅडमीचे प्रशिक्षक कांचन उपरकर, क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक, जिमखाना चेअरमन प्रा. कमलेश कांबळे, प्रा. डी आर आरोलकर, कोकण झोन ४ चे सावंतवाडी येथील सचिव प्रा. चंद्रकांत नाईक, दादासाहेब पवार, दीपक सावंत, सुदेश आंगचेकर, कु. सानिया आंगचेकर आदींचा समावेश होता. या स्पर्दासाठी पंच म्हणून कांचन उपरकर, दादासाहेब पवार, दिपक सावंत, सुदेश आंगचेकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. मुलगे गट-प्रथम- सुरज कमलेश साळवी (डी. बी. जे. कॉलेज चिपळूण, (रत्नागिरी), व्दीतीय— शुभंम एस. साटम (एस. के. पाटील कॉलेज मालवण, (सिंधुदुर्ग), तृतीय- संतोष आर. तांबे (एस. के. पाटील कॉलेज मालवण, (सिंधुदुर्ग), चतुर्थ- वेदांत महेश सुतार (कणकवली कॉलेज, (सिंधुदुर्ग) यांनी तर मुलींच्या गटांत प्रथम हर्षदा दिपक नाईक (एस. के. पाटील कॉलेज मालवण, (सिंधुदुर्ग), व्दीतीय- संजना अमोल भिडये (एस. के. पाटील कॉलेज मालवण, (सिंधुदुर्ग), तृतीय- धनश्री विवेक फिरमे (डी. बी. जे. कॉलेज चिपळूण, (रत्नागिरी), चतुर्थ- रूपाली संतोष दाभोलकर (बँ. बी. के. कॉलेज वेंगुर्ला, (सिंधुदुर्ग) यांनी क्रमांक पटकाविले.या स्पर्धेतील विजेत्या नेमबाज खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.