प्रथमच 5 रुपये डिव्हिडेंडची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रुची सोयाने शुक्रवारी मार्च तिमाहीचे नफा कमाईचे आकडे सादर केले आहेत. यामध्ये कंपनीचा नफा हा वर्षाच्या आधारे जवळपास 25.4 टक्क्यांनी घसरला आहे. सदरच्या तिमाहीत रुची सोयाचा नफा हा करपश्चात 234.43 कोटी रुपये राहिला असून जो मागील वर्षाच्या तिमाहीत 314.33 कोटी रुपये होता. यावेळी कंपनीने प्रथमच 5 रुपये प्रति समभाग डिव्हिडेंड देणार असल्याची घोषणा केली आहे.
महसूलात 37 टक्क्यांची वाढ
कंपनीने बीएसइ फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा महसूल 37.72 टक्क्यांनी वधारुन 6,663.72 कोटी रुपयांवर पोहोचला आहे जो मागील वर्षातील समान तिमाहीत 4,838.5 कोटी रुपये होता.
आर्थिक वर्षात निक्वळ नफा 18 टक्क्यांनी वाढला
कंपनीचा आर्थिक वर्ष 22 मध्ये 806.30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जो आर्थिक वर्ष 21 मध्ये 680.77 कोटी इतका राहिला होता. जर हि तुलना आताच्या आकडेवारीसोबत केल्यास आर्थिक वर्ष 2021 पेक्षा यंदा 18.50 टक्के इतका नफा वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.