वृत्तसंस्था / इंफाळ
गेले दोन महिने हिंसाचारग्रस्त असलेल्या मणिपूर राज्यात आता परिस्थिती सुधारली असून लोकव्यवहार पूर्ववत झाला आहे. त्यामुळे राज्यभरात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्रंाr एन. बिरेनसिंग यांनी दिली. हिंसाचाराला प्रोत्साहन देता येऊ नये, या उद्देशाने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता स्थिती नियंत्रणात असल्याने इंटरनेट बंद ठेवण्याचे कारण उरलेले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.