अडहळ्ळी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन
बेळगाव : अथणी तालुक्यातील अडहळ्ळी गावामध्ये असलेल्या दुर्गा देवस्थानच्या जागेमध्ये इमारत बांधण्यात आली आहे. इतर नागारिकांवर दडपशाही करत त्या इमारतीची उभारणी बेकायदेशीर केली आहे. तेंव्हा संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी अडहळ्ळी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुर्गा देवस्थानची अडहळ्ळी येथे जागा आहे. त्या जागेमध्ये ग्राम पंचायत सदस्याने बेकायदेशीररित्या घर बांधले आहे. आता तेथे रस्ता करण्यात येत आहे. त्या रस्त्यावरही अतिक्रमण केले जात आहे. तेंव्हा ग्राम पंचायतीला तातडीने ते अतिक्रमण हटविण्याची सूचना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वी विरोध केला असता आम्हाला धमकी देण्यात आली आहे. याचबरोबर जाणूनबुजून भांडणे देखील केली जात आहेत. यामुळे काही जण दबावाखाली असून योग्य ती संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.