नवी दिल्ली
ऍपलचा आयफोन 14 खरेदी करणाऱया ग्राहकांसाठी खुशखबर आहे. त्यांना आता हा फोन ऑर्डर केल्यानंतर केवळ 30 मिनीटात मिळू शकणार आहे. याकरीता ऍपलने ब्लिंकीट ऍपसोबत हातमिळवणी केली असल्याचे सांगितले जाते. नव्या आयफोनसाठी आता ग्राहकांना जास्त काळ थांबावे लागणार नाही. झोमॅटोची उपब्रँड कंपनी ब्लिंकीट यांच्याशी ऍपलने नुकताच पुरवठय़ाकरीता करार केला आहे. आयफोन 14 ग्राहकांना अगदी 30 मिनीटात मिळेल अशी व्यवस्था केली जाणार असल्याचे समजते. दिल्ली, मुंबईत ही सेवा सध्या मिळणार असल्याचे सांगितले जात आहे