नवी दिल्ली :
फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि टाटा समूह यांच्या अंतर्गत एकत्रितपणे भारतातच आयफोन 17ची निर्मिती केली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अॅपल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव देण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. 2024 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये भारतातच आयफोन 17 ची निर्मिती सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याआधी या फोनची निर्मिती ही चीन देशामध्ये होणार, असे बोलले जात होते. वरील दोन तैवानी कंत्राटी कंपन्या व टाटासमूह यांच्या माध्यमातून आगामी पुढील वर्षी आयफोन 17 ची निर्मिती हाती घेतली जाणार आहे. अलीकडेच टाटा समूहाने कर्नाटकामध्ये 125दशलक्ष डॉलर्स खर्चुन जागा खरेदी केली आहे. त्याठिकाणी या नव्या फोनचे उत्पादन घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.