देवनहळ्ळीत फॉक्सकॉन उभारणार निर्मितीप्रकल्प : 1 एप्रिल 2024 पर्यंत उत्पादनाचे उद्दिष्ट
प्रतिनिधी /बेंगळूर
आघाडीची आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने 1 एप्रिल 2024 पर्यंत देवनहळ्ळी युनिटमध्ये उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार 1 जुलैपर्यंत पूर्ण प्रमाणात जमीन हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती अवजड आणि मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांनी गुऊवारी दिली. जॉर्ज चू यांच्या नेतृत्त्वाखालील फॉक्सकॉन कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी त्यांची भेट घेतली. यावेळी आयटी-बीटी मंत्री प्रियांक खर्गे हेही उपस्थित होते. मंत्री एम. बी. पाटील पुढे म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील नुतन सरकारने या 13,600 कोटी ऊपयांच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती दिली आहे. या प्रकल्पामुळे 50,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. देवनहळ्ळी जनरल इंडस्ट्रियल एरिया (आरटीआयआर) मध्ये प्रकल्पासाठी 300 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2024 पर्यंत येथे उत्पादन सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ही बाब लक्षात घेऊन ही जमीन 31 जुलैपूर्वी कंपनीला हस्तांतरित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पाकरता प्रतिदिन 50 लाख लिटर पाण्याची गरज भासणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. याची पूर्तता करण्यासह सरकारकडून उत्तम वीजपुरवठा, दर्जेदार रस्ते आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या कौशल्याबाबतचा तपशील देखील विचारण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शासन पात्र लोकांना प्रशिक्षण देणार असून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे, असे मंत्री एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले. तैवानस्थित कंपनीने प्रकल्पाचे बांधकाम तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याची आणि येथे दरवषी 2 कोटी मोबाईल तयार करण्याची योजना आखली आहे. कंपनीने जमिनीसाठी राखून ठेवलेल्या रकमेपैकी 30 टक्के ( 90 कोटी ऊ.) रक्कम यापूर्वीच केआयएडीबीला दिले आहेत, असेही पाटील म्हणाले. पॉल लिऊ, टोनी लिऊ, सायमन साँग, भरत दंडी इत्यादी उच्च अधिकाऱ्यांचा फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळात समावेश होता. यापूर्वी ज्युबिलंट फूड वर्क्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अमरदीपसिंग अहलुवालिया, एफआयसीसीआय कर्नाटक मंडळाचे अध्यक्ष के. उल्लास कामत, कर्नाटक मंडळाचे अध्यक्ष शजू मंगलम, सीआयआय कर्नटक मंडळाचे अध्यक्ष विजयकृष्णन व्यंकटेशन आदींनी मंत्री एम. बी. यांची भेट घेतली होती. यावेळी आयटी-बीटी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव रमण रे•ाr, वाणिज्य आणि उद्योग खात्याचे प्रधान सचिव सेल्वाकुमार, खात्याच्या आयुक्त गुंजन कृष्णा उपस्थित होते.