मुंबई
फेडबँक फायनॅन्शीयल सर्व्हिसेसचा आयपीओ पुढील आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. सदरचा आयपीओ 22 नोव्हेंबरला खुला होणार असून 24 नोव्हेंबरला तो बंद होणार आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना आयपीओकरीता बोली लावता येणार आहे. आयपीओकरीता 133-140 रुपये प्रति समभाग अशी इशु किंमत निश्चित करण्यात आली आहे. याअंतर्गत 600 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत.