नाव वाचताना जीभ अडळखळेल
जर तुम्ही कधी मालगाडी रूळावरून धावताना पाहिली असेल तर त्याचे डबे मोजता-मोजता लहान मुलं थकून जातात. याचमुळे मालगाडीच्या उल्लेख अनेक गोष्टींचा उपहास करण्यासाठी देखील केला जातो. अशाच प्रकारे एका शहराचे नाव वाचण्यास सुरुवात केल्यावर ते संपण्याचे नावच घेत नाही. भाषातज्ञ अत्यंत जलदपणे मोठेमोठे शब्द वाचू शकतात, परंतु अनेकदा असे काही शब्द समोर येतात जे वाचणे निश्चितच सोपे नसते. काहीसे असेच आहे एका ब्रिटिश गावाचे नाव.
हे गाव जितके छोटे आहे तितकेच त्याचे नाव मोठे आहे. या गावाचे नाव 99 टक्के लोक एकाचवेळी अत्यंत अचूकपणे वाचू शकत नाहीत. हे छोटेसे गाव वेल्समध्ये मिनाइ स्ट्रेटनजीक आहे. याचे नाव इतके मोठे आहे की त्याचा नामफलक अत्यंत रुंद करावा लागला आहे. गावाच्या पूर्ण नावात एकूण 58 अक्षरं आहेत. या गावाला युरोपमध्ये सर्वात मोठे नाव असलेले ठिकाण मानले जाते. या गावाचे पूर्ण नाव Llanfairpwllgwyngy llgogerychwyrndro bwllllantysilio gogogoch आहे. या गावाच्या नावाला संक्षिप्त स्वरुपात Llanfair pwll म्हटले जाते. या गावाचे नाव वाचून कुणीच स्वत:चा पत्ता देखील समोरच्या व्यक्तीला नीटपणे सांगू शकत नाही.
16 व्या शतकात या गावाचे नाव Llanfair y Pwllgwy ngyll होते, या गावात एक चर्च देखील होते. गावाचे नाव 1869 मध्ये थट्टेच्या स्वरुपात ठेवण्यात आले होते. ब्रिटनमध्ये सर्वाधिक लांब नावाचे रेल्वेस्थानक मिळावे म्हणून हा प्रकार करण्यात आला होता. सर जॉन मॉरिस-जोन्स नावाच्या शिक्षणतज्ञानुसार एका स्थानिक टेलरने हे नाव दिले होते. केवळ या नावामुळे या गावाला दरवर्षी 2 लाख लोक भेट देत असतात.