अनन्यासोबत ब्रेकअपनंतर चांदनी बेंजसोबत जोडले नाव
ईशान खट्टर सध्या स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशान सध्या मलेशियन मॉडेल चांदनी बेंजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनन्या पांडेसोबत ब्रेकअप झाल्यावर ईशान आता चांदनीला डेट करत आहे.
ईशान स्वत:च्या या रिलेशनशिपवरून अत्यंत गंभीर असल्याचे समजते. जुलै महिन्यात ईशान हा एका युवतीसोबत बाइकवरून फिरताना दिसून आला होता. त्यावेळी दोघांनी हेल्मेट घातले होते. याचबरोबर ऑगस्टमध्ये ईशान एका युवतीसोबत मूव्ही आउटिंगवर गेला होता. त्यावेळीही या युवतीने स्वत:चा चेहरा झाकला होता. परंतु आता ही युवती चांदनीच होती असे समोर आले आहे.
चांदनी सध्या 21 वर्षांची आहे. चांदनीचा जन्म मलेशियाच्या क्वालांलपूरमध्ये झाला होता. परंतु सध्या ती भारतात मॉडेल म्हणून काम करत आहे. चांदनीने यापूर्वी सिंगापूर टीव्ही ड्रामा ‘माय मदर स्टोरी’मध्ये काम केले आहे. तसेच ती ‘गॅब’ नावाच्या एका मलेशियन टीव्ही सीरिजचा हिस्सा राहिली आहे. चांदनी सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ईशानचे यापूर्वी अनन्या पांडेसोबत नाव जोडले गेले होते. खाली पिली या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. परंतु मागील वर्षी त्यांचे ब्रेकअप झाले होते. ईशान लवकरच पिप्पा या चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट 1971 च्या युद्धावर आधारित आहे.