लंडन : ओव्हलवरील ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची भारताकडून जोरदार तयारी चालली असून त्याअंतर्गत भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन गुऊवारी जाळ्यामध्ये सराव करताना फटकेबाजी करताना दिसलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने गुऊवारी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक छोटीशी क्लिप प्रसारित केली. त्यात इशान किशन या लढतीची तयारी करताना आणि चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्यात तो चेंडू सरळ आणि खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी छान प्रकारे फटकावताना दिसलेला आहे. इशान किशनने केलेले जाळ्याचे किल्ल्यामध्ये रुपांतर असे आयसीसीने या व्हिडीओसंदर्भात लिहिले आहे. ईशान मुळात भारताच्या जागतिक कसोटी स्पर्धेसाठीच्या अंतिम संघाचा भाग नव्हता. तथापि, यंदा आयपीएलमध्ये के. एल. राहुलला दुखापत झाल्याने तो या अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही हे निश्चित झाले. त्यानंतर इशानला संघात सामील करण्यात आले. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू रिकी पाँटिंगने या अंतिम सामन्यासाठी त्याने निवडलेल्या संघात स्थान दिले होते. इशान किशन 2021 पासून भारतासाठी 41 मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला असून त्यात त्याने फलंदाजीत व यष्टीरक्षणात प्रभावी कामगिरी केलेली आहे. पण अजून तो एकही कसोटी खेळलेला नाही. गेल्या डिसेंबरमध्ये बांगलादेशविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सलामीस येताना त्याने 131 चेंडूंत 10 षटकार आणि 24 चौकारांसह 210 धावा फटकावून आपण मॅचविनर खेळाडू असल्याचे सिद्ध करून दाखविलेले आहे.
Previous Articleऑस्ट्रेलियाला धास्ती ओव्हलवरील खराब कामगिरीची
Next Article त्रिपुरा क्रिकेट संघटनेच्या सल्लागारपदी क्लुसनर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.