आयपीएस पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज : शापोरा युवक संघाचे कार्य कौतुकास्पद
प्रतिनिधी /म्हापसा
हणजूण वागातोर येथील परिसर आज दर दिवशी विविध आव्हानांना सामोरे जात आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे अमली पदार्थ, या भागात आणि राज्यभर होणारे अपघात यावर मात करण्यासाठी आणि या आव्हानांना सामोरे जाताना जनतेला मदत करण्यासाठी पोलीस सदैव तुमच्या पाठिशी आहेत. अशा गैरकृत्यातून बाहेर पडणअयासाठी क्रीडा क्षेत्र हे महत्त्वाचे आहे आणि त्यात फुटबॉल सामना तर सर्वांचा आवडता झाला आहे. येथील युवा पिढी अशा गैरकृत्याकडे न वळता क्रीडा क्षेत्रात भर देत आहे ही एक आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट म्हणावी लागेल. असे प्रतिपादन आयपीएस पोलीस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी वागातोर येथे बोलताना केले.
शापोरा युवक संघ यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभ 2022 च्या कार्यक्रमात आयपीएस अधीक्षक जॉर्ज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, व्यावसायिक सत्यम ठकराल, उपअधीक्षक विल्सन डिसोझा, राजेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. अशा खेळामुळे युवा पिढी गैरकृत्याकडे वळता सकारात्मक दृष्टीकोनातून ते चांगल्या मार्गाकडे वळतात असे जॉर्ज म्हणाले. पर्यटक हे वाईट म्हणून नका. ते खरोखरच चांगले आहेत. त्यांना योग्यरित्या हाताळणे गरजेचे आहे. एक छोटी वृत्ती राज्याला तसेच पोलिसांना बदनाम करते. येणाऱया आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता ठेवा. तुम्ही गणवेश परिधान न करता गणवेशात असलेल्या पोलिसांना मदत करा जेणेकरून ते तुम्हाला मदत करणार असे अधीक्षक बॉस्को जॉर्ज म्हणाले.
मान्यवरांचा पाहुण्यांच्याहस्ते सत्कार
यावेळी माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्याहस्ते आयपीएस बॉस्को जॉर्ज पोलीस अधीक्षक यांचा तसेच उपअधीक्षक विल्सन डिसोझा, उपअधीक्षक राजेश कुमार, पोलीस निरीक्षक परेश नाईक, निरीक्षक अमित बोरकर, निरीक्षक तुषार लोटलीकर, वाहतूक निरीक्षक गौरेश परब, उपनिरीक्षक वामन नाईक, उपनिरीक्षक जितेंद्र सिनारी, नामांकित वकील ऍड. राजू पोवळेकर, डब्ल्यू हॉटेलचे व्यवस्थापक किशोर विश्वकर्मा, व्हेलवीन मिनेझीस, धेंपो क्लबचे कोच समीर नाईक, कोच सर्वीन फर्नांडिस, मुख्य कोच राजेश साळगावकर, चार्ल्स डायस यांचा स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्याम खुराना, विशांत पानकर, फारुख शेख, मुनीर भट, पंच जालिंदर गावकर, जुझे फिगरेडो यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
खेळाडूंचाही गौरव सोहळा
क्लबचे खेळाडूंचा पोलीस अधीक्षक आयपीएस बॉस्को जॉर्ज यांच्याहस्ते कप्तान सोमा कोरगांवकर, प्रणव गावकर, प्रतीक तिरोडकर, सच्चीदानंद साटेलकर, प्रतीक धारगळकर, हर्षद गावकर, रोहीत तोरड, स्टेफीन मार्टीन, नितेश साळगावकर, मारुती हरीजन, नेहल पार्सेकर, रेनी डायस, अक्षय दाभोळकर, अनिकेत दाभोळकर, दिनेश मोरजकर, अर्जुन शेटगांवकर, अक्षय वेंगुर्लेकर, पवन धारगळकर, विनायक मुळगावकर, फेन्टा डिसोझा, मोहनदास नागवेकर तसेच क्लबचे आयोजक प्रवीण दाभोळकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.