प्रतिनिधी /बेळगाव
ट्रान्स्फॉर्मरनजीक कचरा टाकणे धोक्मयाचे आहे, असे अनेकवेळा सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनंतशयन गल्ली कॉर्नर येथे ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकला जात असून, शनिवारी रात्री या कचऱयाला आग लावण्याचाही प्रयत्न झाला. अशा प्रकारामुळे ट्रान्स्फॉर्मर निकामी होवून आग लागण्याची शक्मयता असल्याने ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकू नये असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात येत आहे.
कचरा टाकण्यास जागा नसल्याने ट्रान्स्फॉर्मरखाली असलेल्या खुल्या जागेत नागरिकांकडून कचरा टाकला जातो. बऱयाचवेळी या कचऱयाला आग लावण्याचे प्रकार घडतात. आग भडकल्यास विद्युत वाहिन्यांना संपर्क होवून ट्रान्स्फॉर्मर पेट घेण्याची शक्मयता असते. असे झाल्यास परिसरालाही त्याचा धोका असतो. हेस्कॉमकडून यापूर्वीही शहरातील अशा ठिकाणांचा सर्व्हे करून परिसरातील नागरिकांना आवाहन करूनदेखील हे प्रकार सुरूच आहेत.
अनंतशयन गल्ली कॉर्नरवर फिल्टरनजीकच्या ट्रान्स्फॉर्मरखाली कचरा टाकला जातो. शनिवारी रात्री यातील काही कचरा पेटविण्याचा प्रकार घडला. परिसरातील नागरिकांनी पाहताच आग विझवली आणि अनर्थ टळला. तरी कचरा टाकताना अथवा कचऱयाला आग लावताना विचार करणे गरजेचे आहे.