ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार येत्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत होईल, असा अंदाज शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंळातील अनेक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदं भरायची आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असे नाही तो करावाच लागणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. मात्र, आता येत्या 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणावरही दबाव नाही. माझ्याबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : …तर माझ्यावर केसेस दाखल करा; अजित पवारांचे फडणवीसांना आव्हान
दरम्यान, राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होत असल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तसेच विरोधकांसह सत्ताधारी आमदारांच्याही नजरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे लागल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.