केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन : पहिल्या दीपगृह महोत्सवाचे गोव्यात उद्घाटन,आग्वाद किल्ल्याचे महत्त्व वाढले
पणजी : ‘भारतीय प्रकाश स्तंभ उत्सव’ किंवा ‘भारतीय दीपगृह महोत्सवा’च्या पहिल्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असून, भारतातील 75 प्रतिष्ठित दीपगृहांच्या समृद्ध सागरी इतिहासाचे पुनऊज्जीवन करणे आणि जगासमोर प्रसिद्ध कथा उलगडणे हा गोव्यात झालेल्या भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचा उद्देश आहे, असे उद्गार केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी काढले. आग्वाद किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या दीपगृह महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटन मंत्रा रोहन खंवटे, आमदार मायकेल लोबो व राज्य आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.केंद्रीय मंत्रा सोनोवाल म्हणाले, दीपगृह महोत्सवाच्या माध्यमातून भारताच्या किनारपट्टीवरील 75 लाइटहाऊसमध्ये जुन्या अभिजात कलाकृतींना पुनऊज्जीवित करण्याची प्रक्रिया सक्षम करत आहोत, या एकमेव उद्देशाने यातील समृद्ध वारसा उलगडणे. आयकॉनिक साइट्स आणि त्यांना जगासमोर सादर करणे हे उद्दीष्ट्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर भारत बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. राष्ट्र उभारणीच्या या पुण्यपूर्ण प्रयत्नात, आम्ही शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटन केंद्रांचे उत्प्रेरक बनण्यासाठी प्रतिष्ठित दीपगृह बनवून मोदीजींची दृष्टी जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
दिवसभर चाललेल्या कार्यक्रमादरम्यान, भारत प्रवाह या इन्स्टिट्यूट फॉर गव्हर्नन्स, पॉलिसी अँड पॉलिटिक्सच्या पुढाकाराने आयोजित ’व्हॅनगार्ड्स ऑफ अवर शोर्स: लाइटहाऊसेस अॅज टेस्टामेंट्स ऑफ इंडियाज पास्ट अँड प्रेझेंट’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जेथे प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ प्रा. राखीगढी फेम वसंत शिंदे यांनी भारताच्या सागरी इतिहासातील दीपगृहांचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. यावेळी मुख्यमंत्री सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व मंत्री रोहन खंवटे यांचीही समयोचित भाषणे झाली. सागरी पुरातत्त्वशास्त्रज्ञ तथा पंतप्रधान संग्रहालयाचे ओसडी डॉ सुनील गुप्ता, गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. वासू उसपाकर यांनीही या मनोरंजक सत्रात भाषण केले. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग खात्याच्या संयुक्त सचिवांनी लाइटहाऊस हेरिटेज पर्यटन विकासाकडे मंत्रालयाचा दृष्टिकोन आणि या टप्प्यातील 75 लाइटहाऊसमधील गुंतवणुकीच्या संधींचे प्रकरण सादर केले.
किनारे होणार आकर्षक पर्यटन केंद्र
राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणच्या समुद्र किनारी असलेल्या दीपगृहांवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि खलाशी तसेच बोटींना मार्गदर्शन व्हावे, यासाठी केंद्र सरकारची ही दीपगृह महोत्सव ही आकर्षक योजना आहे. त्याचा लाभ गोव्याला होणार असून, आकर्षक पर्यटन केंद्र करण्याचे नियोजन केंद्र सरकारचे आहे.