मुंबई
सिमेंट उद्योगात असणाऱ्या जे. के. सिमेंटने 29 टक्के घसरणीसह पहिल्या तिमाहीत 114 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. यांचा समभाग शेअर बाजारात घसरणीत होता. कंपनीच्या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल समभागावर परिणामकारक ठरला. बुधवारपासून समभाग 6 टक्के घसरणीत आहे. दुसरीकडे 2794 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने पदरात पाडून घेतला आहे.