Health Care Tips : हिवाळ्यात अक्रोड सोबत गुळ खाल्ल्याने थंडीत होणाऱ्या संसर्गजन्य आजारापासून आपण वाचू शकतो. याशिवाय अक्रोड आणि गुळ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड,लोह,फॉस्फरस,तांबे,प्रथिने,कॅल्शियम,मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी पोषक तत्वे असतात. तर गुळात प्रोटीन,व्हिटॅमिन बी १२,व्हिटॅमिन बी ६,फॉलेट,कॅल्शिअम,लोह,फॉस्फरस आणि सेलेनिअम सारखी पोषक तत्वे असतात. हिवाळ्यात थंडीच्या दिवसात लहान मुले आणि वृध्द जादा प्रमाणात आजारी पडत असतात त्यामुळे त्यांना या दिवसात अक्रोड आणि बदाम खाण्यास दिले पाहिजे.आज आम्ही तुम्हाला अक्रोडासोबत गुळाचे सेवन केल्यास आरोग्याला कोणते फायदे होतात याविषयी सांगणार आहोत.
अक्रोड सोबत गुळ खाल्ल्याने हाय बीपीची समस्या टाळता येते. हे मिश्रण बीपीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
जर तुम्ही अक्रोड सोबत गुळ खाल्ला तर शरीराला योग्य ऊर्जा देखील देऊ शकता. थकवा जाणवणार नाही.फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळेल. यासोबतच आळसही दूर होतो.
अक्रोड आणि गुळाचे सेवन कसे करावे
उकळलेल्या पाण्यात अक्रोड आणि गूळ पावडर टाकून मिश्रण शिजवून घेवून ते तुम्ही खाऊ शकता. सकाळ संध्याकाळी तुम्ही खाऊ शकता. असे केल्याने घशाच्या समस्येपासून आराम मिळतो.