Jai Ganesh English Medium School Success in Drawing Grade Exam
सन 2022 – 23 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल ने घवघवीत यश संपादन केले प्रशालेतर्फे एकूण 14 विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग नोंदविला होता त्यामध्ये 8 विद्यार्थी अ श्रेणी व 6 विद्यार्थी ब श्रेणी संपादित करीत उत्तीर्ण झाले.प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कलाशिक्षिका सौ.आदिती ठाकूर व सौ. स्मिता वायंगणकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
मालवण / प्रतिनिधी