वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला येत्या गुरुवारपासून माऊंट माँगेनुई येथे प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी वेलिंग्टनमध्ये 24 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पाठ दुखापतीमुळे अष्टपैलू कायली जेमिसन याला ही मालिका हुकणार आहे. तसेच पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा मॅट हेन्री उपलब्ध होणार शकणार नाही असे क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे.
या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व टीम साऊदीकडे सोपविण्यात आले असून जेकॉब डफी आणि स्कॉट कुगेलजिन या दोन नवोदितांना न्यूझीलंड संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंड कसोटी संघ- साऊदी (कर्णधार), मिचेल ब्रेसवेल, ब्लंडेल, कॉन्वे, जेकॉब डफी, स्कॉट कुगेलजिन, टॉम लॅथम, डॅरियल मिचेल, हेन्री निकोल्स, इश सोधी, टिकनेर, वेगनर, केन विलियमसन आणि व्हिल यंग.
इंग्लंड कसोटी संघ- स्टोक्स (कर्णधार), अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रुक, क्रॉले, डकेट, फोकेस, जॅक्स, लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पॉप, मॅथ्यू पॉट्स, ओली रॉबिनसन, रुट आणि स्टोन.