एक झलक सोशल मीडियावर शेअर
अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘उलझ’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण तिने पूर्ण केले असून याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक धडा ठरला असून याची कहाणी माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांसोबत योगायोगाने जोडली गेली असल्याचे तिने म्हटले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रवासाच्या माध्यमातून तुम्ही जे करता त्यावर प्रेम करा, जे करताय ते योग्य कारणासाठी करत आहात का हे जाणून घ्या, बाहेरील दबाव अन् मत सोडून द्या. अशा हम्सटर व्हीलमधून बाहेर पडा जे कुठेच घेऊन जात नाही, स्वत:ला स्वत:च्या वेगानुसार चालू द्या असा संदेश मिळाल्याचे जान्हवीने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. जंगली पिक्चर्सकडुन निर्मित या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत अभिनेता गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू दिसून येणार आहेत. याचबरोबर चित्रपटात राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. चित्रपटात जान्हवी ही भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे.