म्हापसा : गोवा ज्वेलर्स असोसिएशन व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक पणजीत बुधवारी पोलीस मुख्यालयात पार पडली. पोलीस अधिकाऱ्यांनी राज्यातील सराफ्ढाRच्या समस्या जाणून घेतल्या व यावर काय तोडगा काढता येतो याबाबत चर्चा केली. बैठकीला गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर, पोलीस संचालक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. समीर कुडतरकर म्हणाले, की आम्ही पत्रकार परिषद घेतल्याची गृहखात्याने दखल घेत सराफ्ढाRबरोबर पोलीस अधिक़ाऱ्यांची बैठक बोलावली. म्हापशाचे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी याकामी पुढाकार घेतला. पोलीस महानिरीक्षक म्हणाले की, ज्वेलर्स हे आर्थिक बाबतीत जनतेला सदैव सहकार्य करतात. सराफ्ढाRनी सोने घेतल्याशिवाय राहू नये. सोने खरेदी करा व विका पण सोने खरेदी करताना आवश्यक ती खबरदारी घ्या. उद्या कुणी आला व हा माल चोरीचा असल्याचे सांगितले तर त्यावेळी तुम्ही न्यायालयात जा त्यावेळी आम्ही पोलीस सर्वतोपरी मदत करू असे ते म्हणाले. मात्र चुकीच्या पद्धतीने सोने घेतल्यास तुम्ही आपापसात सोडवा तेव्हा आमच्याकडे येऊ नका असे त्यांनी स्पष्ट केले.
परराज्यातील पोलीस येऊन धमकी देऊन त्यांच्याकडून सोने जबरदस्तीने धमकावून घेऊन जातात. अशा तक्रारी अनेक वर्षापासून सुरू होत्या. लज्जेपोटी कुणीही काही बोलत नव्हते, अशी माहिती यावेळी कुडतरकर यांनी दिली. काही चोरटे सुटाबुटात येतात सोनसाखळी कट करून मातीत लोळून आणतात व कुणाची सापडली असल्याचे सांगून विकतात. काहीजण आत येऊन पोलीस असल्याचे भासवून दमदाटी करतात. शर्टर बंद करतात, एसी बंद करतात व शब्दांचा भडीमार करतात, अशी माहिती कुडतरकर यांनी पोलिसांना दिली. मंगळवारी परराज्यातील पोलीस पाच गाड्या घऊन आरोपीसमवेत सोने विकल्याप्रकरणी चौकशीसाठी म्हापशात आले. म्हापसा पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक सिताकांत नायक यांनी या परराज्यातील पोलिसांशी चर्चा केली. ही गोष्ट ज्वेलर्स संघटनेला कळाल्यावर सुमारे 200 सराफ्ढाr पोलीस स्थानकात जमा झाले. ते पोलीस म्हापशात काही दुकानांवर छापा मारू पाहत होते. मात्र स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना माघारी पाठविले, अशी माहिती समीर कुडतरकर यांनी दिली व पोलिसांचे आभार मानले.