अॅपल व एअरटॅगपेक्षाही 4 पट स्वस्त : किंमत 749 रुपये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जिओ या दूरसंचार कंपनीने भारतातील सर्वात स्वस्त ब्लूटूथ ट्रॅकिंग डिव्हाइस जिओटॅग बाजारात सादर केले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर हे उपकरण 2,199 रुपयांना उपलब्ध करण्यात आले आहे. लॉन्चिंग ऑफरमध्ये खरेदीदार 749 रुपयांमध्ये खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे.
व्ग्दऊag व्ग्द.म्दस् सोबत रिलायन्स डिजिटल आणि जिओ मार्ट वरुनही याची खरेदी करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या उपकरणाला अॅपलच्या एअरटॅग आणि सॅमसंग स्मार्टटॅगशी स्पर्धा राहणार आहे.
जिओ टॅगची वैशिष्ट्य
जिओटॅगमध्ये योग्य सीआर 2032 बॅटरीसह सुसज्ज आहे, ज्याचे आयुष्य एक वर्षापर्यंत आहे. डिव्हाइस ब्लूटूथ व्ही5.1 वापरून वापरकर्त्याच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होते. ट्रॅक करण्यासाठी वापरकर्ते ते त्यांच्या वॉलेटमध्ये, हँडबॅगमध्ये किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक वस्तूमध्ये ठेवू शकतात.
अन्य फिचर्स
?घरामध्ये 20 मीटरपर्यंत आणि घराबाहेर 50 मीटरपर्यंत ट्रॅकिंग करणार
? जिओटॅगचे वजन 9.5 ग्रॅम
? नियमित वापराच्या वस्तू
? शोधण्याव्यतिरिक्त, ट्रॅकर वापरकर्त्याच्या स्मार्टफोनचा देखील मागोवा घेणार
? फोन सायलेंट मोडमध्ये असतानाही, जिओटॅगवर डबल टॅप केल्याने फोन वाजणार