पुणे / प्रतिनिधी :
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर शिवसेना, युवासेना आक्रमक झाली असून, गुडलक चौक येथे संजय राऊत यांच्या प्रतिमेला शनिवारी जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
पुणे शिवसेनेचे अध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, संजय राऊत हे कारागृहातून सुटून बाहेर आल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. राेज सकाळी उठून बेताल वक्तव्य करुन सवंग प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न ते करतात. ज्या खासदार, आमदारांचे जीवावर ते खासदार पदावर निवडून गेले त्यांचे नावाने थुंकण्यापेक्षा त्यांनी स्वाभिमानाने पदाचा राजीनामा द्यावा. स्वत:चे चुकी बद्दल व बेताल व्यक्तव्य प्रकरणी त्यांनी माफी मागावी.
यावेळी पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, युवासेना राज्यसचिव किरण साळी, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,माथाडी जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, महिला आघाडी अध्यक्षा लीनाताई पानसरे ,महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, युवासेनेचे आकाश शिंदे, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, संजय डोंगरे, विकास भांबुरे, राजाभाऊ भिलारे, सचिन थोरात, नितीन लगस, गौरव साइनकर, महिला संघटिका श्रद्धा शिंदे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.