वृत्तसंस्था/ सिडनी
7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघात वेगवान गोलंदाज जोश हॅजलवूडचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात हॅजलवूडला दुखापत झाली होती त्यामुळे तो हंगाम अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. पण, ऑस्ट्रेलियन निवड समितीने भारताविरुद्ध फायनलसाठी त्याला अंतिम 15 सदस्यीय संघात स्थान दिले आहे. दरम्यान, 32 वर्षीय हॅजलवूड अष्टपैलू मिचेल मार्श व फलंदाज मॅथ्यू रेनशॉ यांची जागा घेणार आहे. हॅजलवूडच्या समावेशामुळे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड हे चौघे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
ऑस्ट्रेलियन कसोटी संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर.