फलटण / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेवून माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामाबाबत चर्चा केली दरम्यान, नड्डा यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामाविषयी केंद्रीय स्तरावर लवकरच बैठक घेवून संबधीत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जे.पी. नड्डा यांनी दिले असल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लागावेत यासाठी ही भेट असल्याचे सांगत नीरा देवधर, भीमा स्थिरीकरण, फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग या प्रश्नासह आगामी अर्थसंकल्यात निधी प्राप्त होण्यासंदर्भात, फलटण व पंढरपूर येथील विमानतळाबाबत सविस्तर चर्चा नड्डा यांचे बरोबर झाली असून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी फलटण व म्हसवड येथील कॅरिडोर एमआयडीसी बाबतही सविस्तर चर्चा झाल्याचे खा . रणजितसिंह यांनी सांगितले.
यावर जे.पी. नड्डा यांनी हे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी, केंद्रीय स्तरावर विविध मंत्री महोदयांच्या बरोबर व्यापक बैठक लवकरच घेतली जाणार असल्याचे व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन जे. पी. नड्डा आपणास दिले असल्याचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, आपण भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांचीही भेट घेवून माढा लोकमतदारसंघातील पक्ष संघटना व अन्य राजकीय विषय, माढा सातारा व सोलापूर जिल्ह्यातील बुथ रचना, बूथ सशक्तिकरण अभियान, सेवा पंधरवडा, माढालोकसभा मतदारसंघातील आगामी (2024 पर्यंत ) सर्वस्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा निवडणुका तयारी आदि विषयावर महत्त्वपुर्ण चर्चा झाली असल्याचे खा. नाईक निंबाळकर यांनी सांगितले असुन या दोन्ही महत्त्वपुर्ण भेटीततील चर्चा सकारात्मक झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.