बसमध्ये विसरलेला किमती कॅमेरा मालकाकडे सुपूर्द केल्याने कौतुक
प्रतिनिधी / डिचोली
पणजीहून बेळगाव बागलकोट या मार्गावर जाणाऱ्या कदंब बसमध्ये एका प्रवाशाची राहिलेली महागड्या कॅमेराची बॅग बस कंडक्टर नरेश मांद्रेकर यांनी सांभाळून ठेवत परत करण्याची कामगिरी बजावली. हा जबाबदारीपूर्वक प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल सदर प्रवाशाने कंडक्टर मांद्रेकर यांना बक्षिसही दिले.
बेळगाव येथे या कदंब बसमधून उतरलेल्या एका कोल्हापूर येथील राकेश बाळासाहेब कांबळे या प्रवाशाची सुमारे 70 हजार किमतीच्या लेन्स कॅमेराची बॅग या बसमध्येच विसरून उतरून गेले. त्यामुळे बॅग विसरल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवासी राकेश कांबळी यांनी भयभीत होत संबंधित कदंब बस शोधत असताना त्याचवेळी सुदैवाने कांबळी यांना बेळगाव बसस्थानकावर अन्य एक कदंब बस सापडली. त्या बसच्या कंडक्टरशी त्यांनी या बागलकोटला जाणाऱ्या बससंबंधी चौकशी केली असता सदर बसच्या कंडक्टरने आपली ओळख असल्याने त्या बागलकोट बसचा कंडक्टर नरेश मांद्रेकर यांना फोन केला. राकेश कांबळे यांनी सारा प्रकार कंडक्टर मांद्रेकर यांना सांगितला. तोपर्यंत बस लोकापूर येथे पोहोचली होती. त्यामुळे त्यामुळे बस मागे घेऊ शकत नव्हते. त्यामुळे ती बॅग तशीच रात्रभर आपल्याकडे सांभाळून ठेवत परतीच्या प्रवासात येत असताना रवि. दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10.30 वा त्यांनी बेळगाव येथे दाखल होताच राकेश कांबळे यांच्या स्वाधीन केली. बॅग मधील सर्व सामान व कॅमेरा ही सुरक्षित असल्याचे पाहून राकेश यांनी समाधान व्यक्त केले. तर या प्रामाणिकपणाबद्दल कंडक्टर नरेश मांद्रेकर यांना एक बक्षीसही देऊन आभार मानले.