वार्ताहर /लाटंबार्से
बार्देश तालुक्यातील नादोडा येथील नाट्याकलाकार शंकर रवळु नादोडकर यांना नुकताच कला व संस्कृती संचालनालय गोवाचा कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शंकर नादोडकर यांनी इ. तिसरीपासून लहान नाट्याछटांमधून भूमिका साकारण्यास सुऊवात केली. त्यांनी गोव्यात हौशी रंगभूमीवर विविध नाटकांमधून प्रमुख भूमिका साकारल्या. कला अकादमीची भजन स्पर्धा, नाट्या महोत्सव, संगीत नाट्यामहोत्सव तसेच मराठी अकादमीची संगीत नाट्या स्पर्धा, एकांकिका स्पर्धा आदींमध्ये बक्षिसे प्राप्त केली आहेत. त्यांनी नादोडा कला व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले असून सध्या ते संस्थेचे वरिष्ठ सदस्य व मार्गदर्शक आहेत.
शंकर नादोडकर यांनी आतापर्यंत संस्थेच्या अनेक नाटकातून प्रमुख भूमिका साकारून बक्षिसे प्राप्त केली आहेत. त्यांनी गोव्यासह महाराष्ट्र, दिल्ली येथील स्पर्धांमध्येही सहभाग दर्शविला आहे. नादोडा या छोट्याशा खेडेगावातील या गुणी नाट्याकलाकाराने आजपर्यंत दोनशेच्यावर नाटकात भूमिका केल्या आहेत व पन्नासहून जास्त नाटके दिग्दर्शित करून प्रेक्षकांची दाद मिळविली आहे.
त्यांच्या या नाट्या क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल पंचक्रोशीत सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.