वृत्तसंस्था/ कुल्लू
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु राजकीय वातावरण यापूर्वीच तापले आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचलमध्ये भाजपसाठी प्रचार करताना दिसून येणार आहे. पक्षाकडून तिला स्टार प्रचारक केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान कंगना भाजपसाठी प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री ठाकूर हे मंगळवारी सकाळी मनालीच्या सिमसा येथे कंगना रनौतच्या घरी पोहोचले होते. त्यांच्यासोबत मंत्री गोविंद ठाकूर देखील होते. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी कंगनासोबत चर्चा केली आहे. कंगनाने देखील मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.