प्रतिनिधी /तिसवाडी
एकावाडा – करमळी येथील श्री ग्रामपुरुष देवस्थानात आज शनिवार 30 रोजी वार्षिक उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी 10 वाजल्यापासून विविध धार्मिक होतील. त्याचबरोबर श्री सत्यनारायण महापूजा, आरत्या व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी स्थानिक भजनी कलाकारांडून भजनाचा कार्यक्रम होईल. सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृपेस पात्र व्हावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.